रशियात महाभूंकप; अमेरिका-चीनचा त्सुनामीचा इशारा !

0
6

दि .१३पीसीबी)-रशियाच्या भूकंपाच्या तीव्र झटक्याने या देशाला मोठे हादरे बसले. कामचटका या द्वीपसमूहाजवळ शनिवारी 7.1 तीव्रतेचा भूकंप आला. USGS ने त्याची तीव्रता 7.4 इतकी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्सुनामीचा धोका वाढला आहे. अमेरिका आणि चीन या देशांनी या भागात त्सुनामीचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून जपानसह पूर्व आशियातील काही देशांना त्सुनामीचा सातत्याने इशारा देण्यात येत आहे. काही भविष्यवाण्यांनी या देशातील नागरिकांच्या काळजीत भर घातली आहे. त्यात या परिसरात सातत्याने भूकंपाचे हादर बसत असल्याने नागरिक काळजीत सापडले आहेत.

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने (USGS) दिलेल्या माहितीनुसार हा 7.4 तीव्रतेचा भूंकप आहे. त्याचा केंद्रबिंदू 39.5 किलोमीटर खोल असल्याचे समोर आले आहे. आकड्यातील तफावत पाहता याप्रकरणी रशियासह इतर संस्थांनी हा महाशक्तीशाली भूकंप असल्याचे मानल्या जात आहे. भूकंपानंतर पॅसिफिक त्सुनामी वार्गिंग सिस्टिमने लागलीच त्सुनामीचा इशारा दिला आहे. गेल्या काही महिन्यापासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी सुद्धा या परिसरात 7 .1 तीव्रतेचा भूंकप आला होता.