दि. ११(पीसीबी)-निघोजे येथील कुरणवाडी येथे जेष्ट महिला आई श्रीमती सगुणाबाई नानेकर यांच्या हस्ते वृक्षाचे पुजन करून आपल्या वडिलांच्या 7 व्या पुण्यस्मरण निमित्ताने,आंबा,चिंच,जांभूळ,अशा 70 देशी फळझाडांचे वृक्षारोपण करून नवीन पायंडा समाजासमोर पाडला आहे. हे माझे दुसरे वर्षे आहे,यापूर्वीची लावलेली सर्व झाडे जगवली आहेत, आपल्या वडिलांची आठवण आयुष्यभर स्मरणात रहावी या भावनेतून आम्ही वृक्षरोपण केल्याचे गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांनी सांगितले.
आण्णा जोगदंड म्हणाले की,प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्या आठवणी स्मरणात राहाव्यात म्हणून वृक्षरोपण करावे, पर्यावरणाचे क्षेत्र ही वाढेल आणि त्या झाडांशी आपले भावनिक नातेही राहील असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी वृक्षारोपणाच्या वेळी सांगितले.
पुण्यस्मरण निमित्त ह.भ.भ शामराव गायकवाड महाराज याचे किर्तन झाले.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड,गुणवंत कामगार शंकर नानेकर, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, वर्षा नानेकर,सोपान नाणेकर,श्रीमती सगुणाबाई नानेकर,विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष ,कैलास येळवंडे, ह.भ.प श्री.शामराव गायकवाड ,मयुर येळवंडे, विनित नाणेकर,मनिषा नाणेकर, बाजीराव येळवंडे ,तुकाराम मराठे,प्रकाश जामदार,नामदेव नाणेकर,काळूराम लांडगे,गजानन धाराशिवकर,संभाजी येळवंडे,सुनील कुटे,अर्चना नाणेकर,उपस्थित होते.