पिंपरी, दि. ११(पीसीबी) -पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात नगररचना विभागात प्रदीर्घ सेवा दिलेले नगररचनाकार प्रभाकर गणपत नाळे (वय-६०) यांचे ह्रदयविकाराने ३ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. १९८६ पासून ते शासकिय सेवेत होते. महाराष्ट्र शासनाच्या नगररचना विभागात उपसंचालक, सहसंचालक म्हणून त्यांनी ४० वर्षे सेवा केली. पिंपरी चिंचवड महापालिका आणि नंतर प्राधिकरणात मुख्य नगररचनाकार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अनेक मोठ मोठ्या प्रकल्पांत त्यांचे योगदान आहे. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात २०११ ते २०१५ दरम्यान नगररचना विभागत ते कार्यरत होते.