पवना मित्र मंडळातर्फे पत्रकारितेतील योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना पवनेचा राजा पुरस्कार देऊन गौरव

0
4

दि.६(पीसीबी)-पवना मित्र मंडळाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पवनेचा राजा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकारितेतील योगदानाबद्दल सातुर्डेकर यांना गौरविण्यात आले.शिवसेना मावळ संघटक, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, डब्बू आसवानी, माजी विरोधी पक्षनेते दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, हनुमंत नेवाळे,मीनाताई नाणेकर, ऍड. नरेश पंजाबी, विशाल मासुळकर, वस्ताद दत्तोबा नाणेकर या मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कामगिरी बजावलेल्या पुरस्कारार्थीना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पवनेच्या राजाची प्रतिमा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कारार्थीमध्ये सातुर्डेकर( पत्रकारिता क्षेत्र ) यांच्यासह सुधाकर यादव (शैक्षणिक क्षेत्र)डॉ. राहुलकुमार डोंबाळे (वैद्यकीय क्षेत्र) दिलीप पवार (कामगार क्षेत्र) मनोहरबुवा सुभेकर (सांप्रदायिक क्षेत्र) बाळासाहेब उर्फ हनुमंत वाघेरे(उद्योजक क्षेत्र) दिलीप कदम (सामाजिक क्षेत्र) संदीप नाणेकर (क्रीडाक्षेत्र) राजेंद्र वाघेरे (माजी सैनिक) कु.साक्षी नाळे(शैक्षणिक क्षेत्र) यांचा समावेश आहे. प्रास्ताविक योगेश कोंढाळकर यांनी,स्वागत विष्णू नाणेकर यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत वाघेरे यांनी केले. आभार अध्यक्ष विशाल वाघेरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.