प्रभाग क्र. ८ मध्ये शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव सोहळा मा.नगरसेविका सीमाताई सावळे यांच्या हस्ते संपन्न

0
4


दि.५ (पीसीबी) -डॉ. सर्वपल्ली राधा कृष्ण यांची जयंती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी करतो याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक ८ सेक्टर ४ स्पाईन रोड मोशी प्राधिकरण येथील हॉटेल दावणगिरी येथे शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कर्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा.सभापती स्थायी समिती व मा नगरसेविका सीमाताई सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रभागातील सर्व शिक्षकांच्या हस्ते सीमाताई सावळे यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षक हे विदयार्थ्यांना घडवणारे गुरु असून त्यांचं कर्तृत्व हे मोठं असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली तसेच सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच येता जाता दोन पाने जरी वाचली तरी समाजात वाचनाची जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी शिवशंभो वाचन ग्रुप इंद्रायणी नगर असे वाचनालय आदरणीय सौ. सीमाताईंनी उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांच विशेष कौतुक करण्यात आले.

यावेळी फुले सर, राजेंद्र ठाकूर ,दत्तात्रय थोरात, माणिकराव मानकर, दत्तात्रय शिंदे ,शरद खळदे, दत्तात्रय पाटील, गावडे, पंडितराव मोरे, निवृत्ती बांगर , दगडू विश्वासराव ,दिलीप काकडे , चव्हाण, रामदास तांबे, श्रीधर सर , नंदकुमार ठाकूर ,विनायक बहिरट,माणिक जैद ,डॉ. सुनील आवारी , पै.तानाजी फडतरे ,उत्तमराव नागरे ,पोपटराव ढोकले इत्यादींची उपस्थिती होती .