तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो- जरांगे पाटील

0
10

दि. २ (पीसीबी) – जरांगे पाटील LIVE Updates :

– मराठा आणि कुणबी एक असल्याचा नोंदी संबंधी जीआरसाठी दोन महिन्याचा वेळ द्या, उपसमितीची मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मागणी केली. त्याला जरांगे पाटील यांनी मान्यता दिली आहे.
– जीआर काढा 9 वाजेपर्यंत मुंबई खाली झालेली दिसेल. फक्त जीआर काढा असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
– उपसमितीचे अध्यक्ष यांना जरांगे पाटील यांनी जात प्रमाणप्रताबद्दल तात्काळ निर्णय घ्या असे सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांना जातप्रमाणपत्राबद्दल सूचना दिली जाईल असे विखे पाटील यांनी सांगितले.
-जात प्रमाणपत्राबाबत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी जरांगे पाटील यांनी उपसमितीसमोर केला आहे.
– मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोनकर्त्यांना 15 कोटींची मदत राज्य सरकारकडून दिली जाणार असल्याचे जरांगे पाटील यांनी मसुदा वाचून दाखवताना सांगितले.
– सप्टेंबरअखेरपर्यंत आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
-सातारा गॅझेटियरला 15 दिवसांत मान्यता देण्यास मंत्रिमंडळ उपसमिती देण्यास तयार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
– हैदराबाद गॅझेटियरला मंत्रिमंडळ उपसमिती मान्यता देण्यास तयार असल्याचे जरांगे पाटील यांनी मसुदा वाचताना सांगितले.
– मसुदा मान्य झाला की, तातडीचा जीआर काढू असं विखे पाटील यांनी सांगितले असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.