दि.२(पीसीबी)मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला मोठं यश मिळालं असून मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं. त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं उपसमितीने मनोज जरांगे यांच्यासमोर मान्य केलं आहे. तसेच सातारा गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचंही उपसमितीने मान्य केलं आहे.
– हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्या यावी अशी मनोज जरांगे यांची मागणी होती. त्याला शासनाने मान्यता दिली आहे.
– गावातील कुळातील नात्यातील व्यक्तींना चौकशी करुन कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
– सातारा गॅझेटवर अभ्यास करून त्याला जलद मान्यता देण्यात येईल.
– मराठा आदोलकांवरील या आधीचे गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेण्यात येणार.
मनोज जरांगे यांनी या मागण्या मान्य केल्या तर त्यासंबंधी तातडीने जीआर काढतो आणि त्याची अंमलबजावणी करतो असा शब्द मराठा उपसमितीने दिला.
मनोज जरांगे यांच्या आंदोलन थांबवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असून पहिल्यांदाच मराठा उपसमिती जरांगेंच्या भेटीला आझाद मैदानात पोहोचली आहे. मराठा आरक्षणावर सरकारच्या समितीने अंतिम मसुदा तयार केला असून त्यावर जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.मराठा उपसमितीने मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि मसुद्यामध्ये काय तरतूद केली आहे याची माहिती दिली. मराठा उपसमितीमध्ये अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता.
मराठा उपसमितीने आरक्षणाचा मसुदा तयार केला असून त्यावर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. उपसमितीने तयार केलला हा मसुदा मनोज जरांगे मान्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.या आधी शिंदे समितीचे प्रमुख न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. शिंदे समितीने आतापर्यंत काय काम केलं याची माहिती त्यांनी दिली.