मराठ्यांसाठी लढणारे सतीश मानेशिंदे कोण आहेत ?

0
9

दि.२( पीसीबी) -मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोध दाखल याचिकेवर काही वेळातच सुनावणी होत आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडत आहे. काल मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच पालन झालं की नाही याचा राज्य सरकारला अहवाल द्यावा लागणार आहे. आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाण खाली होतील याची मनोज जरांगे पाटील आणि इतरांनी खात्री करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश दिले होते. मुंबईत नव्याने आंदोलकांना प्रवेश न देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. राज्य सरकारने घातलेल्या अटी शर्तींच उल्लंघन झाल्याने तसेच आंदोलनाला कोणतीही परवानगी नसल्याने नियमानुसार कारवाई करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले होते, दरम्यान यासाठी मराठ्यांनी ताकद लावली आहे, या सुनावणीमध्ये बाजू मांडण्यासाठी मोठा वकील मैदानात उतरवला आहे. ज्येष्ठ विधीज्ञ सतीश मानेशिंदे मराठा आंदोलकांची बाजू कोर्टात मांडणार आहेत. आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्या एमी फाउंडेशनचे वकील कोर्टात दाखल झाले. सतीश मनेशिंदे यांनी मनोज जरांगे यांची बाजू मांडत आहेत.

सतीश मानेशिंदे हे हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी ओळखले जातात. त्यांनी याआधीही बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सची बाजू मांडली आहे. सतीश हे सर्व हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी देशातले सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक म्हणून ओळखले जातात. एवढ्या मोठ्या वकिलाची एका दिवसाची फी किती असेल असा प्रश्न सगळ्यांचा पडला आहे.

वकील सतीश मानेशिंदे यांनी सलमान खानच्या १९९८ मधील काळवीट शिकार आणि संजय दत्तच्या १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात बाजू मांडली होती. तेव्हा पासून सतीश मानेशिंदे हे चर्चेत आले आहेत. सतीश मानेशिंदे यांनी सलमान खानला ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात जामीनही मिळवून दिला होता. एवढंच नाही तर र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची बाजूही मानेशिंदे यांनीच मांडली होती. सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या दोघांनाही ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अटक केली होती. या दोघांनाही नंतर जामीन मंजूर करण्यात आला. सतीश मानेशिंदे देशातील महागड्या वकिलांपैकी एक असून २०१० मधील एका रेकॉर्डनुसार ते दिवसाला १० लाख रुपये फी घेतात. सतीश मनेशिंदे हे पालघर जमावबळी प्रकरणात विशेष सरकारी वकील आहेत. प्रसिद्ध दिवंगत वकील राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९८३मध्ये आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. त्यांनी जवळपास १० वर्षे जेठमलानी यांच्यासोबत काम केलेलं आहे. सतीश मानेशिंदे हे भारतातील प्रख्यात फौजदारी वकील आहेत. त्यांनी मुंबईतील अनेक हाय-प्रोफाईल केसेस हाताळल्या आहेत.

सतीश मानेशिंदे यांनी हाताळलेल्या केस

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण

अभिनेता संजय दत्त यांचे वकील म्हणून मानेशिंदे यांना संधी मिळाली. हा केस त्यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांनी संजय दत्त यांना दहशतवादाशी संबंधित गंभीर आरोपांतून निर्दोष सुटका केली

2002 – सलमान खान हिट-अँड-रन केसमध्ये सलमान खानसाठी कोर्टात बाजू मांडली.

2001 – करण बेदी हिट-अँड-रन केस – अभिनेता करण बेदी यांचाही खटला लढवला. या काळात ते सेलिब्रिटी लॉयर म्हणून ओळखले जाऊ लागले.

2010 चे दशक – कॉर्पोरेट + फौजदारी केस

अनेक कॉर्पोरेट वाद, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणे, बांधकाम घोटाळ्यांमध्ये क्लायंटचे प्रतिनिधित्व केले. रहेजा घोटाळा केस हाताळला. या काळात ते गुंतागुंतीच्या आर्थिक गुन्हे आणि ड्रग्ज प्रकरणातही सक्रिय होते.

2021 – आर्यन खान (शाहरुख खान यांचा मुलगा) क्रूझ ड्रग्ज केस

या प्रकरणाने मानेशिंदे पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आले.

त्यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करून आर्यन खानला जामीन मिळवून दिला.