दि. २(पीसीबी)-गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील यांनी आज आमदार अमित गोरखे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी गणपतीचे दर्शन घेऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यानिमित्ताने, राजकीय व सामाजिक वर्तुळातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
गोरखे कुटुंबीयांनी मंत्री महोदयांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत केले. गणपती दर्शनानंतर, मंत्री पाटील यांनी गोरखे कुटुंबीयांशी संवाद साधला. ही भेट केवळ राजकीय औपचारिकता नसून, कौटुंबिक सौहार्द वाढवणारी ठरली. यावेळी, राज्यातील विविध शैक्षणिक उपक्रम आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांवर अनौपचारिक चर्चा झाली.
याप्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे,माजी नगरसेवक राजू दुर्गे, राजदुर्गच्या सरचिटणीस वैशालीताई खाडे, अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष बापू शेठ घोलप, माजी नगरसेविका सौ. कमलताई घोलप, भाजपा महिला उपाध्यक्ष सौ. सुप्रियाताई चांदगुडे, सौ. मनीषा शिंदे आणि श्री. गणेश लंगोटे यांच्या सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अमोल गोरखे यांनी स्वागत केले..
या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या भेटीला राजकीय आणि सामाजिक वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळात मतदारसंघाच्या विकासासाठी अनेक सकारात्मक उपक्रमांची नांदी ठरू शकते, अशी आशा व्यक्त केली जात आहे.