मराठा आंदोलकांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल, पाण्याच्या बाटल्या फेकल्या…मराठ्यांचे वोटेळे शरद पवार ने केले…

0
10

मुंबई, दि. ३१ : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आल्या.

पण मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. सुप्रिया सुळे कशातरी गाडीत बसल्या. पण त्यानंतर आंदोलकांनी प्रचंड गोंदळ घातला. आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांची गाडी अडवली. आंदोलकांनी काही वेळ गोंधळ घातला. सुदैवाने यावेळी काही मराठा आंदोलकांनी गाडी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. पण बरेच मराठा आंदोलक हे गाडी अडवण्यासाठी पळत जाताना दिसले. यावेळी काही आंदोलकांनी शरद पवारांनी आमचं वाटोळं केलं, असं म्हटलं. तर सुप्रिया सुळे यांची गाडी पुढे निघाल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर बॉटलही फेकून मारल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आझाद मैदान येथे जात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत त्यांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुप्रिया सुळे या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी मंचावर गेल्या. पण मनोज जरांगे हे झोपलेले होते. यामुळे त्यांनी इतर मराठा समन्वकांसोबत चर्चा केली. तसेच मनोज जरांगे यांना झोपेतून जाग आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं. यावेळी मनोज जरांगे यांनी मान हलवत होकार दिला. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावलेली बघायला मिळत आहे. त्यांच्यात त्राण दिसत नाहीय. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.