सर्वत्र आपण पाहतो सध्या मुले मोबाईल च्या आहारी जात आहेत..त्यामुळे त्यांची आकलनशक्ती, सृजनात्मक शक्ती संपत जात आहे…
पण संत तुकाराम नगर येथील इमारत न. २०६ मधील १० वर्ष पेक्षा लहान मुलांनी पहा माती शोधून आणून त्याची सुंदर मूर्ती बनवली आणि कुठे ठेवायचं बाप्पा ना….तर दोन कुंड्या मधील जागा निवडून तिथेच सजावट करून बाप्पांना बसवले आणि रोज सकाळ सायंकाळी मोठ्या मंडळ प्रमाणे हे ही चिमुकले आरती करत आहेत, प्रसाद वाटत आहेत.
कुणाचाही मदत न घेता ह्यांनी हे सर्व केलं.
आहे ना कौतुकास्पद…?
श्रीकुशी नाईक, कुश नाईक, मानसी इंगळे, मानवी इंगळे, साकेत शिंदे, श्रेयांस इंगळे ह्या चिमुकल्या लहान लहान मुलांनी ही स्थापना आणि छोटासा नैसर्गिक मंडप उभारून गणेश उत्सव साजरा केला.
श्रीकुशी व कुश ह्या लहान मुलांचे
आर्ट ऑफ लिव्हिंग लहान मुलांची सुदर्शन क्रिया योग, ध्यान आणि (इंटुशन) प्रज्ञा योग सराव, श्री श्री बाल संस्कार केंद्र ह्या द्वारे उत्स्फूर्त होऊन दररोज केल्या जाणाऱ्या सराव मुळे आपली संस्कृती, खूप चांगले संस्कार, आकलन व सृजनात्मक शक्ती, एकत्र येऊन उत्साहाने काम करणे ह्या सर्व सुप्त गुणाचा विकास आणि पालकांचा मुलांच्या सर्वांगीण विकास साठी साथ ह्यामुळे असे अप्रतिम कार्य लहानपण पासून घडू शकते… हे दिसत आहे.
पालकांना आधी वाटलं मुले असेच खाली खेळत असतील, पण खेळता खेळता त्यांनी केलेल्या ह्या उत्कृष्ट कार्याला पालक काव्या नाईक, भालचंद्र नाईक, रोशनी इंगळे ह्यांनी ही गणेश चतुर्थी पासून खूप चांगले साथ प्रोत्साहन दिले.
मोबाईल, टीव्ही पासून दूर होऊन अशा कार्य बाहेरील खेळ, चांगले मित्र ह्यांनी आपण खूप चांगला सर्वांगिण विकास घडवू शकतो हे दिसून आले.
अभिनंद मुलांनो
धन्यवाद!
ह्या सर्व भारताचे भविष्य घडवणाऱ्या चिमुकल्या लहान मुलांना भरपूर आशीर्वाद.