“संवत्सरी- क्षमापना “ दिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करा – डॉ कल्याण गंगवाल

0
3

दि. २९(पीसीबी) – शाकाहाराचे पुरस्कर्ते आणि सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांनी जैन समाजाचा “संवत्सरी- क्षमापना “ दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर “फॉरगेट /फ़ॉर्गिवनेस डे “ म्हणून साजरा करण्याची डॉ. कल्याण गंगवाल यांची केंद्र सरकारकड़े मागणी केली  आहे.  क्षमापना दिवस, ज्याला क्षमावाणी किंवा संवत्सरी असेही म्हणतात, हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी जैन अनुयायी इतरांकडून आणि इतरांना क्षमा मागतात. हे पर्युषण पर्वाचा भाग आहे, जो आत्मशुद्धीचा काळ मानला जातो आणि या दिवसाच्या शेवटी “मिच्छामि दुक्कडं” हा शब्द वापरून क्षमा मागितली जाते.

डॉ. गंगवाल म्हणाले की, जागतिक क्षमा दिन साजरा करण्यामागे एक अत्यंत सकारात्मक विचार आहे. आपण स्वतःच्या चुका स्वीकाराव्यात, दुसऱ्यांच्या चुका माफ कराव्यात आणि मनातल्या राग-द्वेषाचा विसर घालावा.  हा दिवस म्हणजे माणसामधील एक महत्त्वाचा मानवी गुण – क्षमा – याच्या स्मरणाचा आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे. क्षमा करणे, क्षमा मागणे आणि नकारात्मकतेपासून स्वतःची मुक्तता करणे हेच या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात चुकांपासून शिकून पुढे जाणे हे जितके महत्त्वाचे, तितकेच क्षमाशील राहणेही आवश्यक आहे.

पुढे ते म्हणाले की या दिवसामागचा उद्देश जागतिक क्षमा दिन साजरा करण्यामागे एक अत्यंत सकारात्मक विचार आहे. आपण स्वतःच्या चुका स्वीकाराव्यात, दुसऱ्यांच्या चुका माफ कराव्यात आणि मनातल्या राग-द्वेषाचा विसर घालावा. हा दिवस आपण कितीही व्यस्त असलो तरी थांबून स्वतःमध्ये डोकावण्याची आणि आपल्या वागणुकीचा पुनर्विचार करण्याची संधी देतो. ‘क्षमा’ ही दुर्बलतेची नाही तर मजबूत अंतःकरणाची ओळख आहे. जो माफ करतो तो स्वतःसाठी आणि समाजासाठीही मोठे पाऊल उचलतो. क्षमा करणे म्हणजे भूतकाळाला स्वीकारून वर्तमानाला शांततेने सामोरे जाणे.

मानसशास्त्रज्ञांच्या मते, क्षमा केल्याने मानसिक तणाव कमी होतो, नैराश्य घटते आणि मनात स्थैर्य निर्माण होते. नात्यांमधील ताणतणाव कमी होऊन संवाद खुला होतो. केवळ वैयक्तिक संबंधच नव्हे तर सामाजिक सलोखाही यामुळे दृढ होतो. धर्मशास्त्रीयदृष्ट्याही क्षमा ही मोक्षप्राप्तीची साधना मानली जाते. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मातही क्षमेचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. महात्मा गांधी यांनी म्हटले होते – “कमजोर व्यक्ती कधीच क्षमा करू शकत नाही; क्षमा ही बलाढ्यांचीच कृती असते.” म्हणून क्षमेचे महत्व फार मोठे आहे म्हणून “संवत्सरी- क्षमापना “ दिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजर करण्यात यावा असे डॉ. कल्याण गंगवाल यांनी म्हटले आहे.