कायद्याच्या चौकटीत बसेल ते देऊ मात्र ओबीसी आरक्षण काढून देता येणार नाही

0
3

दि. २९(पीसीबी)- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. यावेळी, भाषण करताना आता मागे हटणार नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी चालतील पण आम्ही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. आरक्षणाच्या याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, बोलताना गोळ्या घालणं हे सरकारचं काम नाही. कुणाचही आरक्षण कमी न करता, कुणालाही नुकसान न होऊ देता, जे योग्य आणि शक्य आहे ते सरकार करेल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. यावेळी, त्यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मी दिलं, कुणबी नोदीं केल्या. मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्याचं काम शिंदे समिती आजही करत आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले ते हायकोर्टात टिकले. मात्र, सुप्रीम कोर्टात काही लोकांमुळे ते टिकलं नाही. महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं, तेव्हा त्यांनी बाजू मांडायला पाहिजे होती, ती त्यांनी मांडली नाही. राज्यात माझं सरकार आलं तेव्हा मी 10 टक्के आरक्षण दिलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. आपण मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही शिंदेंनी म्हटले.

ओबीसी समाजाचं आरक्षण काढून किंवा इतर कुठल्याही समाजाचे काढून मराठा समजाला आरक्षण देता येणार नाही. कायद्याच्या चौकटीत जे बसेल ते देण्याची भूमिका सरकारची आजही आहे. ज्या सुविधा ओबीसी समाजाला मिळतायेत त्या मराठा समाजालाही आम्ही देतो. जे योग्य आहे, नियमात बसतंय, त्यासाठी सरकार अजूनही सकारात्मक आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली. गोळ्या घालायचं काम सरकारचं नाहीकुणाचही आरक्षण कमी न करता, कुणाचही नुकसान न करता आरक्षण देण्याची तयारी आहे. गोळ्या घालण्याचा काम सरकारचं नाही, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारं हे सरकार आहे. जे आम्ही दिले त्यावर हे टिका करतात, पण त्यांनीच हे आरक्षण टिकवलं नाही. विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे.