जरांगेंच्या आंदोलनाला कोणाचा पाठिंबा?

0
5

देवेंद्र फडणवीस थेट बोलले…

 दि. २९ (पीसीबी) :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हे मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावर त्यांचे हे उपोषण सुरू झाले आहे. पोलिसांनी जरांगे यांना एक दिवस म्हणजे संध्याकाळपर्यंतची परवानगी दिलेली आहे. मात्र जरागेंनी सरकारकडे ही मुदत वाढवून मागण्याची मागणी केली आहे. जरांगे यांना या मैदानात ५ हजार लोकांचीच मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र सकाळी मराठी आंदोलकांनी आझाद मैदान आणि सीएसमटी परिसर जाम केला होता. जरागेंनी आंदोलकांनी दोन तासात मुंबई खाली करा आणि मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका अशा सूचना दिल्या. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देताना आजही आंदोलनाकरता राजकीय रिसोर्सेस करणारे कोण आहेत? असं म्हटलं आहे.

मला आश्चर्य वाटत आहे की, तुम्हाला हे आज दिसत आहे. यापूर्वी काय झालं हे सर्वांनी बघितलं आहे, आजही आंदोलनाकरता राजकीय रिसोर्सेस करणारे कोण आहेत? आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही, आम्ही याला सामाजिक चष्मातून पाहू, काही राजकीय पक्ष मनोज जरांगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा फायदा करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्यांचं नुकसान होईल, फायदा काही होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांचा निशाणा कोणावर याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला चार सत्ताधारी पक्षातील आंमदारांचा पाठिंबा आहे. विजयसिंह पंडित (अजित पवार गट), राजू नवघरे अजित पवार गट), विलास भुमरे (शिंदे गट) आणि प्रकाश सोळंके (अजित पवार गट) यांचा आमदारांचा जाहीरपणे पाठिंबा असून ते आंदोलनामध्येही सहभागी झाले आहेत. तर मविआमधील आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, (राष्ट्रवादी शरद पवार गट), खासदार संजय जाधव, नागेश आष्टीकर आणि ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) यांचा पाठिंबा आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी आपण आता आझाद मैदानावरून उठत नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. मात्र पोलिसांकडून त्यांना संध्याकाळपर्यंत परवानगी आहे. ही परवनागी वाढवून देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.