पालकांनी मुलांच्या कलागुणांना वाव द्यायला हवा अरुणा तराळ: पारनेर तालुका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव

0
4

पिंपरी ( पीसीबी ) दि . २६ : आयुष्यात सत्कार होणे आणि गुणवंतांच्या पाठीवर थाप मिळणे गरजेचे असते. त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळत असते. पालकांनी मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा, असे मत ज्येष्ठ समाजसेविका अरुणा तराळ यांनी रविवारी (दि २४) व्यक्त केले.
थेरगाव येथील पारनेर तालुका मित्र मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर डॉ. अरुणा भामरे, मंडळाचे संस्थापक हौसाराम घोडके, अध्यक्ष सुनील पोटे, जेष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे, निवृत्त कार्यकारी अभियंता विजयकुमार ठुबे, डॉ. बाळासाहेब बांडे, किरण तिकोणे, बाजीराव जगदाळे, साहित्यिक देवा झिंजाड आदि उपस्थित होते.

अरुणा भामरे म्हणाल्या, ‘आयुष्यात येणारे अनुभव जीवन समृद्ध होण्यासाठी महत्वाचे असतात. त्यातूनच आपले जीवन घडते. आपण समाजाचं काही देणं लागतो. या भावनेने आपण काम करावे. यश मिळवल्यानंतर गाव, समाज आणि देश यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती वाढवायला हवी. तरुणांनी वाचायला हवे.’

दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कार
यावेळी एमबीबीएस मधील अनुष्का रेपाळे, बीएएमएसमधील गायत्री रेपाळे, डॉ विजय जाधव, बारावी कॉमर्स मधील निशांत वाढवणे, बारावी विज्ञान शाखेतील अनुज पगार, अथर्व शिंदे, स्वराज येणारे, प्रतीक्षा खोसे, वरून घोडके, किमया मुनोत, कौस्तुभ जराड, दहावीतील यजत चव्हाण, शर्वरी शेळके, शार्दुल आवारे, श्रावण रेपाळे, श्रावणी बंगाळ, शंतनु सालके, गायत्री मातेरे, गार्गी थोरात, तनिष्क मोरे, गौरी पिंगळे, आलोक खोसे, अनुष्का चाफे, साक्षी खटाटे, सुजल आंग्रे, अर्णव कारखिले, मयुरेश खोसे, शिवम शिंदे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विजयकुमार ठुबे, विजय लोंढे, नितीन खोडदे, अनिता लटाबळे, वृषाली वायाळ, पल्लवी आढाव भिवाजी थोरात यांचा विशेष गौरव करण्यात आला.
नीता खोडदे यांनी सूत्रसंचालन केले. किरण तिकोणे यांनी आभार मानले. मधुकर शितोळे, प्रमोद जगदाळे, अशोक वाबळे, गोरक्ष जगताप, राजाराम मुंढे यांनी संयोजन केले.