नृत्यकला मंदिरच वर्ष 30 पुरती हे स्त्री तत्वाला समर्पित आहे असे आणि त्याप्रमाणे हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आम्ही सर्व मुली आणि स्त्रिया मिळून करत आहोत.

0
8

नृत्य गुरु तेजश्री अडिगे यांना मॉरिशस येथील गणपती उत्सवामध्ये नृत्य सादरीकरणाचं खास आमंत्रण

दि. २५ (पीसीबी) : विभव जागतिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक मंच आणि महाराष्ट्र मंडळ फेडरेशन ऑफ मॉरिशियस यांच्यातर्फे नृत्यकला मंदिर संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका नृत्य गुरु तेजश्री अडिगे यांना मॉरिशस येथील गणपती उत्सवामध्ये नृत्य सादरीकरणाचं खास आमंत्रण मिळालेल आहे.

नृत्यकला मंदिर या कलेसाठी वाहिलेल्या संस्थेच्या 20 विद्यार्थ्यांनी खुद्द मॉरिशियस चे प्रधान मंत्री श्री नवीनचंद्र राम गुलम यांच्यासमोर कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. पंतप्रधान राम गुलम यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार होणार आहे. हा सोहळा गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर म्हणजेच 27 आणि 28 ऑगस्ट रोजी मॉरिशस येथे संपन्न होणार आहे.
त्याचबरोबर कलाकारांना स्टेट हाऊस म्हणजेच राष्ट्रपती भवनामध्ये बोलवण्यात आले आहे

नृत्यकला मंदिर या संस्थेचा हा जवळजवळ आठवा परदेश दौरा असून त्यांनी जगभरातील विविध देशात जसे की फ्रान्स, युरोप, दुबई, सिंगापूर, मलेशिया,स्पेन, थायलंड येथे नृत्याचे सादरीकरण केले आहे आणि पुन्हा एकदा मॉरिशियस येथेच नृत्य नाटिका सादरीकरण करण्यासाठी येत आहेत.

या सोहळ्यात पारंपारिक शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य-नाट्य प्रकारांच्या माध्यमातून भक्तीरस, संस्कृती आणि कला यांचा सुरेख संगम साधला जाणार आहे. गणपती बाप्पाच्या मंगलमय उपस्थितीत होणारे हे कार्यक्रमाचे प्रस्तुतीकरण, मॉरिशस मधील बांधवांसाठी तेथील दूरदर्शन केंद्र वर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. नृत्य मला मंदिरच्या त्रिदशकपूर्ती वर्षामधील हा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. 21 कलाकारांना घेऊन नृत्यदिग्दर्शिका तेजश्री आणि २५ तारीख रोजी मॉरिशस येथे प्राचारण करतील

नृत्य कला मंदिर या संस्थेला तीस वर्षे पूर्ण झाली असून या संस्थेने पंधरा हजाराहून अधिक नृत्यांगना घडविले आहेत अनेक चित्रपटातील तारे तारकांना नृत्य प्रशिक्षण दिले आहे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली 20 वर्ष सातत्याने विजेतेपद घेत आहेत.