प्रभाग रचनेत कोणताही बदल नाही…महापालिका प्रभाग रचना जाहीर, २०१७ चा नकाशाच कायम

0
6

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकिसाठी प्रभाग रचना निवडणूक विभागाने आज जाहीर केली. विशेष म्हणजे रचनेत कुठलाही फरक नसून २०१७ चीच रचना आहे तशीच कायम ठेवण्यात आली आहे.
चार सदस्यांचा एक असे एकून ३२ प्रभाग आहेत. सर्व प्रभागांचा मिळून एक नकाशा सुरवातीला जाहीर कऱण्यात आला असून तो जुन्याच रचनेप्रमाणे कायम आहे. ३२ प्रभागांच्या हद्दी कुठून कुठवर याचा तपशिल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. जुना मूळचा नकाशाच कायम असल्याने बदल होणार या अपेक्षेवर राहिलेल्या असंख्य इच्छुकांची निराशा झाली आहे.
लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ असून त्यात अनुसुचित जातीची २ लाख ७३ हजार ८१० आणि अनुसूचित जमातीची ३६ हजार ५३५ दर्शविण्यात आली आहे. प्रभागाची सरासरी लोकसंख्या ५३ हजार ९९० आहे. प्रभागातील कमाल लोकसंख्या ५९ हजार ३८९ तर, किमान ४८ हजार ५९० आहे.