सावधान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; ४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी

0
5

दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर ओसरत असला तरी काही भागांत हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर पावसाची तीव्रता अजून कायम राहणार असून, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश प्रामुख्याने ढगाळ राहणार असून ठिकठिकाणी मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. रायगड आणि रत्नागिरीतही पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.