(पीसीबी) दि. २० : हवामान विभागाने सोमवारपाठोपाठ मंगळवारीही वर्तवलेल्या इशाऱ्यानुसार पावसाने मुंबईत दमदार वर्षाव केला. मंगळवारी दिवसभर पाऊस सुरूच राहिल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे, अँटॉप हिल, एमजी आर चौक, कानेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर या भागात दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. अशातच ता बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जुहू इथल्या त्यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याच्या परिसरातही पाणी साचल्याचं पहायला मिळतंय.
अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यासमोरील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये बंगल्याबाहेर पाणी साचल्याचं दिसून येत आहे. बंगल्याच्या आत कम्पाऊंड परिसरातही पाणी साचलं आहे. एका तरुणाने त्यांच्या बंगल्याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. मुंबईच्या पावसापासून सेलिब्रिटीसुद्धा वाचू शकले नाहीत, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. व्हिडीओ शूट करताना तो तरुण बंगल्याच्या सुरक्षारक्षकापर्यंत पोहोचतो, परंतु नंतर गार्ड लगेच गेट बंद करतात आणि त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगतात.