तिरुपती बालाजीला १४० कोंटीचे सोने दान करणार हा भक्त

0
5

दि. २० (पीसीबी) :  आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की एका भक्ताने भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांना सुमारे १४० कोटी रुपयांचे १२१ किलो सोने दान करण्याचा निर्णय घेतला आहे. देवाला तब्बल १४० कोंटीचे सोने दान करणार या भक्ताबदल्ल स्वत: सीएमनी घोषणा केली आहे.
तिरुपती बालाजीचे भक्तांचे दान नेहमीच चर्चेत असते. आता भगवान वेंकटेश्वर स्वामी एका भक्ताने त्याला व्यवसायात आलेल्या यशा म्हणून आनंदी होत बालाजीला १४० कोटी रुपयांचे १२१ किलो दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या संदर्भात स्वत: माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगलागिरीत गरीबी निर्मूलन कार्यक्रमात ही घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की या भक्ताने एक कंपनी सुरु करण्याचे स्वप्न पाहीले होते. त्यांनी सांगितले की भगवान व्यंकटेश्वर स्वामी यांच्या कृपेने त्यांच्या कंपनीच स्थापन झाली नाही तर तिला मोठे यश मिळाले. नायडू पुढे म्हणाले आता या भक्ताला वाटतेय की या यशाचे श्रेय भगवान बालाजीला दिले पाहीजे. त्यासाठी १२१ किलोचे सोने व्यंकटेश्वर स्वामींना अर्पित करणार आहे. त्यांनी पुढे सांगितले की या भक्ताने त्याच्या कंपनीचे ६० टक्के शेअर विकून १.५ अब्ज अमेरिकन डॉलर कमावले आहेत.