दि.१९ पीसीबी -चिंचवड मध्ये पारंपरिक जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात “श्रावण सुंदरी 2025” हा भव्य सोहळा आज (17 ऑगस्ट) चिंचवड येथील एल्प्रो मॉलमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला.पिंपरी चिंचवड (PCMC) मधील फॅशन इंडस्ट्रीतील मोठं नाव आयोजक सौ. सई तापकीर यांच्या उत्तम नियोजनात व फॅशन ग्रूमर योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला.युवती गटामध्ये मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब जिंकला व लहान गटात सानिका सावळे विजयी झाली आहे तर मिस गटात जिया देव्हारे आणि मिसेस गटात सौ. सरिता बेगुडे या विजेतेपदाच्या मानकरी ठरल्या आहेत . तर पुरुष गटातून ओम काळे यांनी हा ‘किताब जिंकला आहे
या स्पर्धेचे परीक्षण जाहिरा शेख, मंगेश सर आणि विकी शिंदे यांनी केले. अत्यंत कसून परीक्षणानंतर योग्य विजेते ठरवण्यात आले. फॅशन शो, मंगळागौर खेळ, मेकअप स्पर्धा यांसारख्या उपक्रमांमुळे कार्यक्रम रंगतदार झाला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. आयोजिका सौ. सई तापकीर यांनी सांगितले, “हा सोहळा म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळेच कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.” यावेळी आधार फॉउंडेशन चिफ आणि भा.ज.पा चे सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेन्ट श्री.धनराज गवळी , ऑल इंडिया फॅशन असोसिएशन चे अध्यक्ष चार्ल्स विलियमन्स फाउंडर ( IMODA) या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती .