पवना धरण, सतर्कतेचा इशारा

0
2

पिंपरी, दि. १८ . पीसीबी –संततधार पावसाने पवना धरण भरले आहे. धरण सद्यस्थितीमध्ये 97.45% भरलेले आहे. पुणे जिल्हा तथा घाटमाथा परिसराकरिता हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे. नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी धरणात येते आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता आज दुपारी दोन वाजता जलविद्युत केंद्राद्वारे ८०० क्युसेकने विसर्ग सोडण्यात येणार आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्ष अधिकाऱ्यांनी केले आहे.