दिवाळीनंतर राज्यात महापालिका निवडणुकीचे फटाके फुटणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांकडून जोरदार तयारी सुरु असून, राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आगामी निवडणुकीसाठी महायुती विधानसभेप्रमाणेच एकत्र मैदनात उतरणार असल्याची चर्चा वरिष्ठ नेत्यांकडून सुरु आहे. अशातच अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल यांनी एकला चलो रे असा नारा दिला आहे.
प्रफुल पटेल हे भंडारा दौऱ्यावर असताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.कार्यकर्त्यांना संबोधीत करताना, ‘निवडणुकीत युतीचा विचार डोक्यातून काढून टाका’, असा सल्ला दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत शक्य असेल तिथे महायुती एकत्र मैदनात उतरेल असे सूचक वक्तव्य केले होते. दरम्यान, पटेल यांच्या या विधानामुळे राजकीय गोटात संभ्रम निर्माण झाला आहे.
नेमकं काय म्हणाले पटेल?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जिथे युती होईल तिथेच युती करायची असे आमचे धोरण आहे. त्यामुळे युतीचे डोक्यातून काढून टाका. युती कुठे कुठे करणार ज्या प्रभागात आपल्याकडे सक्षम उमेदवार असे दुसऱ्याकडे असेल आता तीन पक्ष आहेत त्यामुळे तिसऱ्याकडेही उमेदवार राहू शकतो. अशा परिस्थितीत आपल्या कार्याकर्त्यांना संधी देण त्यांचे मन दुखवणे हे योग्य वाटत नाही. त्यामुळे जिथे सोयीचे वाटत असले आपण तिथे बघू असे म्हणत युती न करण्याचे सूचक विधान पटेल यांनी केले आहे.