पिंपरी,दि. १६ (पीसीबी)- श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, प्राधिकरण येथे सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता राष्ट्रहितार्थ महाआरती २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात ज्येष्ठ हिंदुत्ववादी संघर्षयोद्धा समीर कुलकर्णी, विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार उमा खापरे, विधानपरिषद तालिका सभापती अमित गोरखे, भाजप पिंपरी – चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची विशेष उपस्थिती राहील. सुमारे दोनशे एकावन्न भगवाधारी नारींचा सहभाग हे सोहळ्याचे खास
वैशिष्ट्य राहणार आहे. या सोहळ्यात प्राधिकरणातील ऑक्सिजन पार्क ग्रुप, गणेश प्रभाग शाखा, चैतन्य हास्य क्लब, भगवान महावीर जैन समाज ग्रुप, आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रुप, भूतपूर्व सैनिक संघ, सीरवी क्षत्रिय समाज, मित्र परिवार ग्रुप, श्रीराम प्रभाग शाखा, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ, अखिल प्राधिकरण बचत गट महासंघ या संस्था सहभागी होणार आहेत. सर्व नागरिकांनी या सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप पिंपरी – चिंचवड शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे (ज्येष्ठांचा मानसपुत्र) आणि श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे यांनी केले आहे.