निराधारांना आधार देण्याचे सहारा वृद्धाश्रमाचे कार्य प्रेरणादायी- अभिनेते सयाजी शिंदे

0
4

दि. ११ (पीसीबी) : निराधार होणे हे पूर्वी अपघाताने अपवादात्मक स्वरूपात दिसून यायचे परंतू अलिकडे नवीन पिढी जाणीवपूर्वक आपल्या माता पित्यांना निराधार बनवत असल्याची चिंता ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी येथे व्यक्त केले. पुण्यातील ग्रीन आईज ऑर्गनायझेशन या पर्यावरणावर काम करणाऱ्या कंपनीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सहारा वृद्धाश्रमास समाज रत्न पुरस्कार नुकताच देण्यात आला.
स्मृतिचिन्ह, मानपत्र व अकरा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी हा पुरस्कार स्विकारला.प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते ताथवडे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
मावळ तालुक्यातील कुसवली या आदिवासी गावात सहारा वृद्धाश्रम असून येथे १४ निराधार आजी आजोबांचा विनामूल्य सांभाळ केला जातो.मराठी चित्रपट अभिनेत्री व या कंपनीच्या प्रमुख आर्या घारे, कामगार नेते इरफान सय्यद, नितीन शिंदे यावेळी उपस्थित होते