दि. ११ (पीसीबी) : श्रावणी सोमवारी पुण्यात मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १६ हून अधिकजण जखमी झाले आहेत.
दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना, नागमोडी वळणावर घाट चढताना गाडी रिटर्न आल्याने महिला भाविकांची पिकअप जीप पलटली, विशेष म्हणजे या पिकअपने ५ते ६ पलटी खाल्ल्यानं त्यातील २५ ते ३० महिला भाविक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात व चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत.