महाराष्ट्र | ४ ऑगस्ट २०२५ ( पीसीबी ) :जनसुरक्षा कायदा नुकताच विधानसभेने मंजूर केला आहे. मात्र, विरोधकांकडून या कायद्याला विरोध सुरुच आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या कायद्यावर बोट ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. आम्हाला फक्त अटक करुन दाखवा असे राज ठाकरे यांनी म्हटले. त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागात तर तुम्हालाही अटक होईल..अशा शब्दात उत्तर दिले.
राज ठाकरे यांनी रायगडमध्ये बोलताना जनसुरक्षा कायद्यावर निशाना साधला. आम्हाला अर्बन नक्षल म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःची पात्रता तपासावी. आम्हाला फक्त अटक करुन दाखवा. अशा शब्दात टीका करत आव्हान दिले. त्यावर नागपुरमध्ये माध्यमांशी बोलताना अशा प्रकारची वक्तवे ही कायदा न वाचता केलेली आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.
हा कायदा त्यांच्याकरता बनलेला नाही. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाहीत. त्यामुळे तुमची अटक करण्याचे कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलयची पूर्ण मुभा आहे. त्यासाठी हा कायदा नाही. अशा प्रकारची विधाने ही कायदा न वाचता केलेली आहेत असे फडणवीस यावेळी म्हणाले.












































