पुणे, दि. 2 ( पीसीबी ) काल पुणे येथे उपमुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना चिखली येथील निष्कासन कारवाईत विस्थापित झालेल्या लघुद्योजकांना चिखली येथेच विकसित औद्योगिक पार्क उभारून पुनर्वसन करावे व त्यांच्या झालेल्या नुकसानीची पिंपरी चिंचवड महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांच्या कडून भरपाई मिळावी याबाबत निवेदन देण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्यांबाबत ही निवेदन देण्यात आले. मा. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी वरिल दोन्ही विषयांबाबत त्वरित बैठक घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.या वेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुणे जिल्हा श्री अजयभाऊ भोसले व संचालक श्री संजय सातव उपस्थित होते.