वारंवार दंगलीचा परिणाम महाराष्ट्रातील उद्योग, धंदा रोजगारावर

0
9

पुणे, दि. 2 ( पीसीबी ) – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये काल दोन गटात तणाव निर्माण झाला होता. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झालेला. या तणावामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करावा लागलेला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावर आज खासदार संजय राऊत बोलले. “धार्मिक विद्वेश निर्माण करायचा. मग समाजात अशा पद्धतीने विष पसरवून निवडणुकींना सामोर जायचं. हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भाजपच राष्ट्रीय धोरण ठरलं आहे. कोणत्या विषयावर त्याला धार्मिक रंग द्यायचा. कुरापती काढायच्या. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडतायत. याचा परिणाम महाराष्ट्रातील उद्योग, धंदा रोजगारावर होतोय. विकासावर होतोय” असं संजय राऊत म्हणाले.

“राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतायत गुंतवणूक वाढली आहे. दौंड हा औद्योगिक पट्टा आहे, तिथे एमआयडीसी कारखाने उद्योग आहेत. बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे. अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या, त्याला जबाबदार कोण? पोलीस, मंत्री काय करतायत? ही गंभीर गोष्ट आहे” असं संजय राऊत म्हणाले.

राज्याचे नवीन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल वाकडी काम करुन ती नियमात बसवण्याविषयी एक वक्तव्य केलं. त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. “ते वाकडी काम करुन सतेवर आले. ती सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत का?. शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करुन दुसऱ्या पक्षात गेले. वाकडी काम करुन जे सत्तेवर आले, त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवता येणार नाही. राहुल गांधी सांगतायत मतांची चोरी झाली, ते महाराष्ट्रात पण झालय. महाराष्ट्रात अशा प्रकारची वाकडी काम करुन सत्तेवर आलेत” अशी टीका राऊतांनी केली.

भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवलीय. त्यावर राऊत म्हणाले की, सरकार ट्रम्पना घाबरलं. “भारत-रशियाची जुनी मैत्री आहे. रशिया भारताचा भरवशाचा मित्र आहे. अमेरिकेच्या आधीपासून आपला रशियासोबत व्यापार आहे. ट्रम्प यांनी इशारा दिला आणि आपण व्यापार बंद केला, हे योग्य नाही भारत स्वतंत्र, लोकशाही असलेला देश आहे. 140 कोटी आपली लोकसंख्या आहे. आम्हाला वाटेल त्या देशासोबत आम्ही व्यापार करु शकतो. हे ट्रम्प सांगू शकत नाहीत. हिंदुस्थानला ट्रम्प कशी धमकी देऊ शकतो? हे सरकार फेल आहे. सरकार पुढे काम करु शकत नाही, सरकारासोबत जगातील एकही देश सोबत नाही ही गंभीर बाब आहे” असं संजय राऊत म्हणाले.