जेष्ठ नेते बाबू नायर यांची काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती

0
26

पिंपरी, दि. ३० ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्वीकृत सदस्य बाबू नायर यांची प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदावर फेर नियुक्ती कऱण्यात आली आहे. आल इंडिया काँग्रेसचे नियुक्तीपत्र नुकतेच श्री. नायर यांना देण्यात आले. शहरातील

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यकाळातही नायर हे सरचिटणीस होते. आजवर पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेसच्या नऊ अध्यक्षांबरोबर नायर यांनी काम केले. टी.ए.तिरुमनी हे शहराध्यक्ष होते, तेव्हापासून म्हणजे १९८० पासून नायर हे काँग्रेसमध्ये आहेत. एनएसयूआय जिल्हा समितीवरही ते होते. युवक काँग्रेसमध्ये शहर सरचिटणीस, सेवादल शहराध्यक्ष, शहर प्रवक्ते, नंतर प्रदेश प्रतिनिधी म्हणून नायर यांचा चढता आलेख कायम राहिला. महापालिकेत दोन वेळा स्वीकृत सदस्य म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनिय होते. २०१० ते २०१२ मध्ये राज्यात प्रथमच स्थायी समिती सदस्य होण्याचा मानही त्यांना मिळला होता. महापालिकेच्या शहर सुधारणा, क्रीडा समितीतही त्यांनी काम केले.

काँग्रेसमधून सन २०१४ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये शहर सरचिटणीस पदावरही त्यांनी संघटनाबांधनीचे काम केले. आमदार महेश लांडगे यांच्या निवडणुकित प्रचार प्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचेही निकटवर्ती म्हणून सर्वांना ते परिचयाचे आहेत. २०२२ मध्ये भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.