वकिलांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्हा सत्र न्यायालय पिंपरी चिंचवड शहरात

0
28

दि . २९ ( पीसीबी ) – केवळ वकिलांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्हा सत्र न्यायालय पिंपरी चिंचवड शहरात आल्याचा दावा बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पिंपरी चिंचवड एडवोकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट रामराजे जी भोसले पाटील व संपूर्ण कमिटी आणि सर्व माजी अध्यक्ष व त्यांची कमिटी तसेच महाराष्ट्र व गोवा राज्याचे नोटरी संघटनेचे निरीक्षक एडवोकेट आतिश लांडगे साहेब यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व पत्र व्यवहारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत स्वतंत्रपणे वरिष्ठ न्यायाधीश आणि स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश यांचे न्यायालय स्थापन व्हावे म्हणून वेळोवेळी सन 2023 पासून आजच्या तारखेपर्यंत सतत पाठपुरावा करण्यात आला. पत्रव्यवहार करण्यात आले सदर पदाधिकारी यांनी वारंवार स्वतःच्या कामातून वेळ काढून महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ व महाराष्ट्र राज्याचे प्रमुख उच्च न्यायालय यांच्याकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील जवळपास 35 लाख लोकसंख्या असलेल्या स्वतंत्र महानगरपालिकेमधील लोकांना न्याय मिळावा म्हणून मदत झाली त्याचाच एक प्रयत्न म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत एडवोकेट रामराजे जी. भोसले पाटील व त्यांची कमिटी आणि एडवोकेट आतिश लांडगे साहेब यांच्या प्रयत्नातून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची नेमणूक व कार्यभार निश्चित झालेला असून त्याप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिये मधून सन 2024 मध्ये पत्रव्यवहार होऊन तशाप्रकारे आदेश पारित झालेला असून आज रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आज रोजी म्हणजेच दि. 29 जुलै 2025 रोजी पिंपरी चिंचवड साठी भरीव कामगिरी म्हणून त्यायोग्य प्रस्ताव मंजूर केलेला आहे, याचा पिंपरी चिंचवड मधील पक्षकार मंडळी तसेच आज रोजी असलेल्या जवळपास 2300 वकील मंडळींना फायदा व सोयीस्कर होणार आहे, सदरच्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड मधील सर्व नागरिकांना वकील बांधव भगिनींना फार मोठा फायदा तसेच सोयीस्कर होणार आहे,
सदरच्या निर्णयामुळे पिंपरी चिंचवड मधील एडवोकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट रामराजे जी भोसले पाटील व महाराष्ट्र आणि गोवाचे निरीक्षक एडवोकेट अतिशजी लांडगे यांनी समस्त बंधू भगिनी आणि रहिवासी यांना मदत व आनंद होणार असल्याचे जाहीर केले.