तळेगावच्या माजी नगरसेवकावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0
28

पार्टीत येऊ नको म्हटल्याने अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण
पिंपरी, दि. २९ – लहान मुलांच्या पार्टीत मुलांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगरसेवक किशोर भेगडे याच्या मुलाला येऊ नको, असे म्हटले. या कारणावरून संतापलेल्या किशोर भेगडे याने संबंधित मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी किशोर भेगडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा बेलमोंडो या उच्चभ्रू सोसायटी मध्ये लहान मुलांनी क्लब हाऊस मध्ये पार्टी केली. या पार्टी मध्ये किशोर भेगडे याच्या मुलाला येण्यास त्या मुलांनी नकार दिला. याबाबत त्याने वडील किशोर भेगडे याला सांगितले. संतापलेल्या किशोर भेगडे याने आपल्या मुलाला पार्टीत येण्यासाठी नकार देणाऱ्या मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवले बापू भेगडे यांचा किशोर भेगडे हा पुतण्या आहे. तो तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी असे चार गुन्हे दाखल आहेत. आता अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.