लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार

0
23

दि. २८ ( पीसीबी ) – महायुतीसाठी गेल्या निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेत ४ हजार ८०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे हस्तांतरण प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाले?

लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्र्यांना आदिती तटकरेंवर आरोप करणार नाही. मी कोणावरही खोटे आरोप करत नाही, करणार नाही. सरकार कसे चालते हे मला माहिती आहे. त्यामुळे मी कोणावर खोटे आरोप करणार नाही.

सरकारने जी आकडेवारी दिली त्यातूनच हा 4 हजार 800 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड होते. हा घोटाळा कुणी केला, कसा केला, त्यात कोणाचा सहभाग आहे. बँकेचा आहे की अन्य कुणाचा यावर काही सांगता येणार नाही.

लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाले, पुरुषांचे फॉर्म रिजेक्ट कसे झाले नाहीत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला,.मी तटकरेंवर आरोप करणार नाही, ज्यांनी निर्णय घेतला त्या महाराष्ट्र कॅबिनेटची ही जबाबदारी आहे.

लाडकी बहीण योजनेचे सॉफ्टवेअरमधून हा घोटाळा झला आहे. बहिणीनं पैसे दिले आहेत त्याचे स्वागत आहे, पण घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी. तसेच लाडकी बहीण योजनेची श्वेतपत्रिका काढावी अशी देखील मागणीही सुळेंनी यावेळी केली आहे.