धर्मांतरासाठी दबाव, पिंपरी कँम्पातील प्रकाराणे शहरात खळबळ

0
9

दि . २८ ( पीसीबी ) – पिंपरी कॅम्प परिसरात धक्कादायक घटनेचा खुलासा झाला आहे. धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या अमेरिकी नागरिकासह दोघाजणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकणी दोघांना अटक केली असून विधी संघर्षित अल्पवयीन मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याप्रकरणी सनी बन्सीलाल दनानी (२७, रा. ब्लॉक सी-१७, वैष्णवी मंदिराजवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी शेफर जेविन जेकब (४१, रा. माय होम बिल्डिंग ए-२०४, मुकाई चौकाजवळ, मूळ रा. कॅलिफोर्निया, अमेरिका), स्टीवन विजय कदम (४६, रा. फ्लॅट क्रमांक ५०१, रायसोनी सोसायटी, उद्यम नगर, अजमेरा, पिंपरी) आणि एका विधी संघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेले सिंधी समुदायाला ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्यासाठी प्रलोभने देऊन बायबलचे पत्रके वाटप करत होते. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास मानसिक समाधान, सुख, शांती व आर्थिक सहाय्य मिळेल, प्रभू येशूच खरा देव आहे, इतर धर्म आणि देव केवळ काल्पनिक आहेत, असे म्हणत धर्मांतराचा आग्रह केला.

पोलिसांनी शेफर जेकब आणि स्टीवन कदम यांना अटक केली असून, अल्पवयीन बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तसेच, त्यांच्याजवळचे मोबाईदेखील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २९९, ३(५) व विदेशी नागरिक कायदा कलम १४ (b)(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

सिंधी समुदाय हा मोठा लक्ष्य आहे आणि असे समजले आहे की अनेक सिंधी बांधव खोट्या प्रलोभनांना बळी पडून धर्मांतरित झाले आहेत. याशिवाय, गीता फुटवेअर, साईबाबा कलेक्शन आणि इतर मोठ्या बांधकाम व्यावसायिकांचे मालकही ख्रिश्चन बनले आहेत, यापैकी बहुतेक क्रिप्टो ख्रिश्चन आहेत. याची पुष्टी सरकारद्वारे केली जाऊ शकते.प्रमुख संघटना, सेंट्रल पंचायत, पिंपरी यांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.