पिंपरी, दि.19: पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी “जनसंवाद अभियान” पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश चालक-मालकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढणे हा आहे, अशी माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड यांनी दिली.
या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष नाना गुंड,व रिक्षा ब्रिगेड प्रमुख अनिल शिरसाठ, जिल्हा कार्याध्यक्ष जाफरभाई शेख, युवक अध्यक्ष शुभम तांदळे , पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष विशाल ससाणे, विद्यार्थी वाहतूक अध्यक्ष प्रदीप सहकार्यअध्यक्ष साबळे डांगे चौक विभाग अध्यक्ष सलीम पठाण , रिक्षा ब्रिगेड पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष सुखदेव लष्करे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या अभियानाद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालक-मालकांच्या विविध समस्यांवर चर्चा करून त्यांच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदू शेठ शेळके, पिंपरी चिंचवड शहर सल्लागार संदीप कुरुंद, राहुल सस्ते ,गणेश शेठ सस्ते, शेखर वागस्कर , अतुल आल्हाट ,समीर आल्हाट, संजय वहिले ,दीपक भालेकर, सुनील टेकाळे ,रामदास सस्ते, अभिजीत धोत्रे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या अभियानामुळे चालक-मालकांच्या समस्यांना योग्य व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.