कुदळवाडी, चिखली मधील मंदिर आणि मस्जिदींना दिलेल्या डिमॉलिशन नोटिसेस वर न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

0
8

आकुर्डी, दि. १७ (पीसीबी) चिखली-कुदळवाडी येथील धार्मिक स्थळांना ‘अतिक्रमण’ असे लेबल लावून पीसीएमसी ने दिलेल्या नोटिसेस बाबत आज आकुर्डी येथील न्यायालयाचे न्यायाधीश व्हि. एस. डामरे यांनी पीसीएमसी आयुक्त तसेच अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्पष्टीकरण द्यावे अशी कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.

ॲड.असीम सरोदे, ॲड.श्रीया आवले, ॲड. रोहित टिळेकर, ॲड. अरहंत धोत्रे यांनी एकूण 16 मस्जिदींच्या बाबतीत आक्षेप अर्ज आकुर्डीच्या न्यायालयात दाखल केले होते. कोणत्या जमिनीवर कोणत्या भागात अतिक्रमण आहे?, जे बांधकाम आहे ते अनियमित आहे, की अनधिकृत आहे की बेकायदेशीर आहे याबाबत काहीही स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये नाहीत, अशी एकतर्फी नोटीस महाराष्ट्र नगर रचना कायद्याच्या कलम 35 नुसार अशी चुकीच्या पद्धतीने नोटीस देणे बेकायदेशीर आहे. कायद्याची प्रक्रिया न करता व अतिक्रमण हटविण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना पीसीएमसी ने पाळल्या नाहीत, लोकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही असे ‘योग्य प्रक्रियेबाबतचे’ ॲड.असीम सरोदे यांनी मांडलेले अनेक आक्षेप ग्राहय धरून न्या. व्ही. एस. डामरे यांनी पीसीएमसी विरोधात दिनांक 16/07/2025 रोजी कारणे दाखवा नोटीस जारी केल्या आहेत आणि दिनांक 31/07/2025 पर्यंत उत्तर दाखल करावे असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.