किल्ले रायगडवर जाणाला पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद

0
6

दि . १५ ( पीसीबी ) – राज्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झालं असून पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने किल्ले रायगडावर जाणाऱ्या पारंपरिक पायरी मार्गावर तातडीने बंदी घालण्यात आली आहे.

किल्ले रायगडवर १५ ऑगस्टपर्यंत संभाव्य आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ नये या उद्देशाने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गडावर जाणारा पायरी मार्ग सर्व नागरिक, पर्यटकांसाठी प्रतिबंधित केल्याची माहिती लेखी आदेशाद्वारे दिली आहे.

महाड उपविभागीय अधिकारी यांच्या २० जूनच्या अहवालानुसार, आगामी पावसाळ्यामध्ये दगडी वारंवार पडण्याची घटना होण्यात शक्यता नाकारता येत नसून दगडी पडून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये याकरिता किल्ले रायगडवर जाणाला पायरी मार्ग पावसाळा ऋतू संपेपर्यंत बंद करण्यात यावा. तसेच, पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवेचा वापर करण्याचे आवाहान करण्यात यावे अशी विनंती उपविभागीय अधिकारी महाड यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली होती.