पिंपरी, दि. १४ –
संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव दिल्यामुळे संभाजी महाराजांचा सन्मानच झाला आहे.तरीदेखील कुणाचा या नावाला आक्षेप असेल तर कोर्टात जावे. संभाजी ब्रिगेड कधीच झुंडशाही गुंडगीरी खपवून घेत नाही, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रदेश सचिव प्रकाश जाधव यांनी दिला आहे.
संभाजी ब्रिगेटचे प्रदेश अध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर काळा रंग टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न रविवारी अक्कलकोट येथे झाला. संघटनेच्या वतीने या घटनेचा निषेध कऱण्यात आला आहे. आपली भूमिका मांडताना प्रसिध्दीपत्रात प्रकाश जाधव म्हणतात,
महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी झाली. संभाजी ब्रिगेड ही संघटना शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांवर वाटचाल करणारी संविधानाचा आदर करणारी संघटना आहे. संभाजी ब्रिगेड ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी तरूणांमधे प्रचंड लोकप्रिय असलेली विज्ञानवादी संघटना आहे. संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते प्रशिक्षित असून कोणत्याही विषयावर बिनतोड युक्तीवाद करतात.संभाजी ब्रिगेड ला रोखणे विरोधी विचारसरणीच्या लोकांना अवघड झाले आहे.काहीजण प्रचंड अस्वस्थ आहेत.मुळात महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी तसेच शिवप्रेमी हे शिवाजी संभाजी ही नावे आदराने घेतात.शेकडो वर्षांपासून जय भवानी जय शिवाजी ही घोषणा मोठ्या आदराने दिली जाते.तसेच प्रतापगड वरील अफझलखान वधाचे वर्णन करताना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी असे आदराने म्हंटले जाते.मराठी माणुस संततुकाराम महाराजांना …
महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडची स्थापना पंचवीस वर्षांपूर्वी झाली.संभाजी ब्रिगेड ही संघटना शिव शाहू फुले आंबेडकर विचारांवर वाटचाल करणारी संविधानाचा आदर करणारी संघटना आहे.संभाजी ब्रिगेड ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी तरूणांमधे प्रचंड लोकप्रिय असलेली विज्ञानवादी संघटना आहे.संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते प्रशिक्षित असून कोणत्याही विषयावर बिनतोड युक्तीवाद करतात.संभाजी ब्रिगेड ला रोखणे विरोधी विचारसरणीच्या लोकांना अवघड झाले आहे.काहीजण प्रचंड अस्वस्थ आहेत.मुळात महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी तसेच शिवप्रेमी हे शिवाजी संभाजी ही नावे आदराने घेतात.शेकडो वर्षांपासून जय भवानी जय शिवाजी ही घोषणा मोठ्या आदराने दिली जाते.तसेच प्रतापगड वरील अफझलखान वधाचे वर्णन करताना होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी असे आदराने म्हंटले जाते.मराठी माणुस संततुकाराम महाराजांना तुकोबा, संत ज्ञानेश्वर महाराज यांना ज्ञानोबा ,जोतिराव फुलेना जोतिबा, शिवाजीमहाराज यांना शिवबा असे आदराने म्हणतो. यामुळे संभाजी ब्रिगेड या नावामुळे कुठेच संभाजी महाराजांचा अनादर होत नाही.संभाजी ब्रिगेड हे नाव दिल्यामुळे संभाजी महाराजांचा सन्मानच होतो.कोल्हापूर च्या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ हे नाव देऊन सरकारने शिवाजीमहाराज यांचा सन्मान केलेला आहे अवमान नाही.अहमदनगर जिल्ह्याला महाराष्ट्र सरकारने अहिल्यानगर हे नाव दिल्यामुळे राजमाता अहिल्यादेवींचा सन्मान केला आहेअवमान नव्हे. महाराष्ट्रात अनेक आईवडील आपल्या मुलांची नावे शिवाजी संभाजी ठेवतात. महाराष्ट्रातीलअनेक शाळांना शिवाजी विद्यालय, शिवाजी विद्यामंदिर, शिवाजी ज्ञानमंदिर, शिवाजी महाविद्यालय अशी नावे आहेत.पुण्यातील एका भागाचे नाव शिवाजीनगर आहे. या सर्व बाबींचा विचार केल्यास संघटनेला संभाजी ब्रिगेड हे नाव दिल्यामुळे संभाजी महाराजांचा सन्मानच झाला आहे.तरीदेखील कुणाचा या नावाला आक्षेप असेल तर कोर्टात जावे.संभाजी ब्रिगेड कधीच झुंडशाही गुंडगीरी खपवून घेत नाही.