दि . १३ ( पीसीबी ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भेट देत विमानतळाची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की, सप्टेंबर 2025 मध्ये हे विमानतळ प्रवासी सेवेसाठी कार्यान्वित होणार असून त्याआधी उर्वरित 6% काम पूर्ण करायचे ध्येय ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 94% काम पूर्ण झाले असून, प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमध्ये 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची क्षमता असेल.
या विमानतळावर जगातील सर्वात वेगवान ‘बॅग क्लेम सिस्टीम’ विकसित केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केले.
महत्त्वाचे टप्पे:
✅ दि. 10 जून 2022 रोजी संपूर्ण 1160 हेक्टर जागेवर 100% प्रवेश व मार्गाधिकार सिडकोमार्फत NMIALला हस्तांतरित
✅ सिडकोकडून सुमारे ₹2000 कोटींच्या पुनर्वसन आणि भूसंपादनाचे काम पूर्ण
✅ दि. 29 मार्च 2022 रोजी NMIAL ने वित्तीय ताळेबंदी साध्य केली; SBI कडून ₹12,770 कोटींचा निधी मंजूर
✅ सिडकोतर्फे 1160 हेक्टर क्षेत्रामध्ये 5.5 मीटरपर्यंत भूविकास
✅ उलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरण
✅ दि. 11 ऑक्टोबर 2024 रोजी C-295 विमानाचे उदघाटन लँडिंग, SU-30 ने 2 लो पास
✅ दि. 29 डिसेंबर 2024 रोजी इंडिगो A320 विमानाने पहिले व्यावसायिक लँडिंग
✅ दि. 30 जून 2025 पर्यंत या प्रकल्पाने एकूण 96.5% भौतिक प्रगती
सध्या या प्रकल्पावर 13,000 कर्मचारी कार्यरत असून उर्वरित काम वेळेत पूर्ण होण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गणेश नाईक, आ. महेश बालदी, आ. मंदा म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते.