दि . १२ ( पीसीबी ) – मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार यांच्या पर्यावरणा संदर्भातील कार्याची दखल घेत दलित पॅंथरच्या वतीने केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अरुण पवार यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पद्मश्री नामदेवराव ढसाळ यांनी स्थापन केलेल्या दलित पँथर संघटनेच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात पवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दलित पॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष मा , यशवंत नडगम मा , रमेश जाधव रजत पदक विजेते महाराष्ट्र शासन सेवानिवृत्त वनअधिकारी मा , प्रकाश इंगोले मा , संदीप तिकटे मा ,कॅप्टन मा , युवराज माने मा , किशोर आटरगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार मोहोळ यांनी अरुण पवार यांच्या कामाचे कौतुक करीत वृक्षमित्र मित्र आहात याचा अभिमान वाटला असे सांगितले. तसेच आपल्या हातून अशीच जास्तीत जास्त वृक्ष लागवड होऊन देशाची सेवा घडावी. आपले समाजकार्य असेच वाढत राहावे, अशा शब्दात कामाचे कौतुक केले.
अरुण पवार यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले, की आजपर्यंत केलेल्या वृक्षारोपण कार्याची दखल घेतल्याबद्दल समाधान वाटले. आपण गेल्या १३ वर्षात २५ हजाराहून जास्त जाळीसह झाडे लावली आहेत. तसेच त्यांचे संवर्धनही केले आहे. आज ज्या संस्थांना झाडांच्या रोपांची गरज आहे, त्यांना ५ फूट उंचीची रोपे आम्ही मोफत देतो. त्याचप्रमाणे आवश्यकता असेल अशा ठिकाणच्या झाडांना टँकरने पाणी घालून ती झाडे जगवतो.
Home Maharashtra केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षमित्र अरुण पवार यांना पुरस्कार प्रदान