दि . १२ ( पीसीबी ) – रविवार, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल यांच्या वाढदिवसानिमित्ताने हॅप्पी स्ट्रीट झुंबा आपल्या उत्तम आरोग्याकरिता सर्वांसाठी आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमासाठी हजर असणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. तसेच लहान मुला – मुलींसाठी मनोरंजनाचे कार्टून कॅरेक्टर ठेवण्यात आलेले आहे.
तरी प्रभागातील सर्व पुरुष महिला, तरुण- तरुणींनी, नागरिकांनी सकाळी ०७:०० वाजता उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
● कार्यक्रम स्थळ – महेशनगर चौक, एच ए ग्राउंड समोर, संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे – १८.
● वेळ सकाळी ०७:०० वाजता.