हिंगजवडतील डेव्हलपमेंट एकाच कंट्रोल यंत्रणेकडे

0
34

मुंबई, दि. १० : महाराष्ट्रात वाढतं औद्योगिक आणि शैक्षणिक शहर म्हणून पुणे, पिंपरी चिंचवडकडे पाहिलं जातं, विशेष म्हणजे याच पुण्यातील आयटी हब म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या हिंजवडीतील वाढती गर्दी, वाहतूक समस्या आणि पावसाळ्यात होणारी दुर्दशा नेहमीच चर्चेत असते. अनेकदा हिंजवडीतील (IT) वाहतूक समस्येवरुन पालकमंत्री अजित पवारांच्या समक्ष बैठकाही झाल्या आहेत. मात्र, कायमचा तोडगा अद्याप निघालेला नाही. आता, हिंजवडी आयटी पार्कसंदर्भात सरकारने ॲक्शन प्लॅन आखला असून येथील पायाभूत सुविधा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजेखड्ड्यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल, सोबतच मेट्रोचे काम देखील त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान पुण्यातील हिंजवडीचा प्रश्न विधिमंडळात गाजला होता. याप्रश्नी आमदार महेश लांडगे यांनी बैठकीत झालेल्या विषयांची माहिती दिली.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्याद्वारे हिंजवडीत पाणी साचणार नाही यासाठीचा अहवाल ही सल्लागार समिती देणार आहे. तसेच, ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि महापालिकेत समन्वय करण्यासाठी एका अधिकाऱ्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. मुख्यमंत्र्‍यांच्या उपस्थितीत मुंबईत पुणे हिंजवडीसंदर्भाने बैठक झाली, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. या बैठकीनंतर आमदार महेश लांडगे यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीची माहिती दिली.
पुणे महापालिका, एमआयडीसी, पीएमआरडीए अशा चार ते सहा यंत्रणांकडून हिंजवडीची डेव्हलपमेंट होत होती. आता, आज मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एक चांगला निर्णय झाला की या सगळ्याचे डेव्हलपमेंट कंट्रोल एकाच यंत्रणेकडून होईल. विभागीय आयुक्त हे सगळं कंट्रोल करतील. काही त्रुटी डेव्हलपमेंट करताना राहिल्या होत्या, त्या त्रुटीसुद्धा आता टाईम बाउंड पिरेडमध्ये सोडवल्या जातील. हिंजवडीतील वाहतूक कोंडीची समस्या,पावसामुळे पाणी आलं, रस्त्यांचे प्रश्न, कनेक्टिव्हिटीचे प्रश्न यावर देखील बैठकीत चर्चा झाली, असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं.

पाऊस थांबला तर हे काम लगेच सुरु केलं आहे, अंडरपास काही ठिकाणी केले जाणार आहेत, काही ठिकाणी फ्लाय ओवर तर काही ठिकाणी सिक्स लेन रस्ते केले जाणार आहेत. पीएमआरडीए सगळे काम करेन. पुढच्या पावसाळ्यापर्यंत या सगळ्या तक्रारी दूर झाल्या पाहिजेत, अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जे लोक आज आमच्यासोबत आले होते, ज्यांनी तक्रारी केल्या त्यांच्याकडे मार्ग कसा काढायचा याचे सुद्धा एसओपी आहेत. पुणे विभागीय आयुक्त हे नोडल ऑफिसर या सगळ्याचे असतील, वेळोवेळी याचा आढावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.