मुंबई, दि . ५ ( पीसीबी ) : हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आले. आम्ही एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, अशा शब्दांत शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काही दशकांनंतर राज आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमाकडे फक्त राज्याचे नाही तर देशाच्या नजरा लागल्या होत्या. हेच नाही तर यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावत म्हटले की, जे बाळासाहेबांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमले. वरळीतील डोममध्ये झालेल्या विजयी मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
या मेळाव्यानंतर आता संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले. संजय राऊत म्हणाले की, सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत. महाराष्ट्राच्या शत्रूंनी आता आवराआवार करावी. आज आम्ही सण साजरा करतोय. आम्ही एकत्र हे राजकीय विधान असल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या शत्रूला धडा शिकवला पाहिजे, या जिद्दीतूनच माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला. आजचे चित्र पाहिल्यावर मुंबईचा नाद सोडावा. भाजप मुंबई मिळू शकत नाही, असेही राऊतांनी म्हटले.
पुढे बोलताना राऊतांनी म्हटले की, आम्ही मराठीसाठी गुंडागिरी केली आणि करणार. माझा आणि राज ठाकरेंचा कायम संवाद असायचा. तो संवाद राहिला यामुळेच हे सर्व घडू शकले. राजकारणामध्ये संवाद पाहिजे. जे आपले टिकाकार आहेत, ज्यांच्याशी आपले मतभेद आहेत, त्यांच्याशी संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सरकारी म्हणून भाऊ म्हणून माझा कायम संवाद असायचा आणि तो संवाद हा असायला पाहिजे.
पुढे हे सत्तेत महाराष्ट्राचे शत्रू बसले आहेत, त्यांनी आवराआवर करायला सुरूवात केली पाहिजे. सिंहासन खाली करा, ठाकरे आले आहेत, अशी घोषणा आम्ही देणार आहोत. हे कसे विरोधक आहेत हे मोदी शहा यांनी हवा भरलेले फुगे आहेत. कोण शिंदे कोण राणे? मोदी शहा हे हवा भरत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले, त्याचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना देतो, असेही संजय राऊत यांनी नुकताच म्हटले आहे. भाजपावर जोरदार टीका करताना संजय राऊत हे दिसले आहेत.