नाशिक महानगरपालिका पथकाने घेतली पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांची व प्रकल्पांची माहिती…
पिंपरी, दि . ४ ( पीसीबी ) : देशात सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या नेतृत्वात शहरात विविध विकास कामांचे मॉडेल उभे राहिले आहे. तसेच शहरातील नागरी समस्यांवर दीर्घकालीन आणि समतोल उपाययोजना तयार करण्यात आलेल्या विकास कामाचे मॉडेल जाणून घेण्यासाठी रस्ते रचना व एनएमटी प्रकल्पांसाठी तांत्रिक अनुभव व, विनिमय व अभ्यास या तीन दिवसीय दौऱ्याअंतर्गत नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट दिली. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी अभ्यास बैठकीला सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, मनोज शेठीया, बापूसाहेब गायकवाड, उप आयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, ममता शिंदे, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंह बन्सल, सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, प्रदीप चौधरी, मुख्य अभियंता रवींद्र बागुल, संदेश शिंदे, शहर अभियंता संजय अगरवाल, मुख्य सल्लागार अनिकेत कुलकर्णी, सल्लागार प्राची देशमुख, दीपा मनोगुली, प्रतिक गोद्रे, शिवलीला अरोरा हे अधिअक्रि उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात सामाजिक भागीदारीतून युवकांना रोजगाराच्या संधी देणाऱ्या ‘कौशल्यम’, महिलांना आर्थिक सक्षम करणारा ‘सक्षमा तसेच महानगरपालिकेच्या विकासाच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या फॉक्सबेरी संचलित ‘सीटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (CHDC), सीटी ट्रान्सफोर्मेशन ऑफिस(CTO), दिव्यांग भवन फाउंडेशन, स्थापत्य, हरित सेतू, ग्रीन बॉण्ड, इंटग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, शहरातील पुराच्या व गटारीच्या पाण्याचे नियोजन, बस स्थानक व त्यांचा वापर, स्वच्छ भारत मिशन,गार्डन पीपीपी, आयसीसीसी, नवी दिशा, वेस्ट टू एनर्जी, पावसाळी पुरग्रस्त भागांतील पूल, जलशक्ती अभियान, स्वच्छ भारत अभियान, सीएसआर अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. सस्टेनेबिलिटी सेल, क्लायमेट बजेट, सोशल इम्पॅक्ट बॉण्ड, म्युनिसिपल बॉण्ड, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, टीडीआर योजना, स्मार्ट स्ट्रीट, सौर उर्जा वापर, जलनियोजन, सीवरेज ट्रीटमेंट, ईआयसीसी सादरीकरण, रोड असेसमेंट मॅनेजमेंट सिस्टम अशा अनेक शहरी उपक्रमाची तसेच शहरात सुरु असलेल्या विकास कामांची व प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.
शहरातील विकास कामांची पाहणी करतांना नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांनी शहरातील थेरगाव येथील ‘ बटरफ्लाय’ पूल, गुरुवर्य भोसरीकर माऊली तथा ज्ञानोबा भीमाजी लोंढे पादचारी पूल, वाकड येथील टीडीआर स्कीम, मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प तसेच विविध ठिकाणी भेटी दिल्या. शहराट सुरु असलेल्या विकासकामांचे कौतुक केले व असेच प्रकल्प नाशिक शहरात राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहरात रस्ते रचना व एनएमटी प्रकल्पांसाठी तांत्रिक अनुभव व, विनिमय व अभ्यास या तीन दिवसीय दौऱ्याअंतर्गत लखनऊ महानगरपालिका, कानपूर महानगरपालिका,अयोध्या महानगरपालिका, सहारनपूर महानगरपालिका, उत्तर प्रदेश शहरी रस्ते विकास विभाग व नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त व अधिकारी शहरातील विकासकामाची पाहणी करण्यासाठी आले आहेत. पहिल्या दिवशी शहरातील रस्त्यांचे नियोजन, अर्बन स्ट्रीटस्केप, हरित सेतू, ग्रीन बॉण्ड, इंटग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, रस्ते वाहतूक नियोजन, सर्वसमावेशक रस्ते रचना, बांधकाम नियोजन या विषयांवर आधारित प्रकल्पांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.
तसेच शहरातील मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पीसीसीओई पाटील रस्ता, हरित सेतू अंतर्गत प्रायोगिक तत्वावार सुरूअसलेले काम, आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, पुनावळे चौक, सांगवी येथील रक्षक चौक, साई चौक, पिंपळे सौदागर येथील लिनिअर उद्यान या ठिकाणी भेटी दिल्या. पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेल्या तसेच शहरात सुयोग्य नियोजन करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती अधिकारी वर्गाने यावेळी घेतली.
…..
देशात सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराकडे पाहिले जाते. येथील महानगरपालिका राबवत असलेल्या प्रकल्पांमुळे येथील नागरिकांना फायदा होताना दिसत आहे. असेच पिंपरी चिंचवड महानगरपालिके प्रमाणे लोकोपयोगी व पथदर्शी उपक्रम राबविण्याचा नाशिक महानगरपालिकेचा मानस राहील.
-मनीषा खत्री, आयुक्त, नाशिक महानगरपालिका
—–
पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नात असते. देश विदेशातील महानगरपालिका अभ्यास दौऱ्यानिमित्त शहरात येत आहेत. यांतून शहराचे नाव नाव उंचावत आहे. शहर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे समाधान आहे.
-प्रदीप जांभळे पाटील , अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका