व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मैदान सज्ज

0
10

दि . ४ ( पीसीबी ) – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नुकताच उभारलेल्या प्रकाशझोत यंत्रणेच्या चाचण्या पार पडल्या असून येणाऱ्या हंगामात प्रथम श्रेणीच्या प्रकाश झोतातील सामन्यांसाठी मैदान सज्ज झाले आहे, अशी माहिती विजय कदम यांनी प्रसिध्दीपत्रात दिली आहे.
पत्रकात ते म्हणतात, महापालिकेचे विशेष आभार मानावे लागतील की त्यांनी येथे आवश्यक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत,,प्रकाशझोत यंत्रणेव्यतिरिक्त पावसाळ्यातील सरावाकरिता सहा कृत्रिम खेळपट्ट्या असलेला ईनडोअर हॉल तसेच सामन्यादरम्यान इतर राज्यातून येणाऱ्या खेळाडू,व्यवस्थापक व पंच ह्यांना रहाण्यासाठी पॅव्हेलियनमध्ये 18 खोल्या देखील उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच बरोबर अकॅडमीचे प्रायोजक व्हेरॉक इंजिनिअरिंग कंपनीचे देखील आभार मानले पाहिजेत कारण त्यांनी प्रायोजित केल्यामुळे खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देणे शक्य झाले आहे आणि येथील खेळाडूंची प्रथमश्रेणीच्या सामन्यासाठी निवड झाली आहे . प्रत्येक हंगामात अकॅडमीच्या वतीने विविध वयोगटातील सुमारे दहा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे
महिलांच्या क्रिकेटला देखील प्राधान्य दिले जाते आहे
ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून निःसंशयपणे महाराष्टातील प्रथम क्रमांकाची अकॅडमी असल्याचा अभिमान वाटतो,,