युवक नेत्याच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर, त्याच्या पत्नीसह सात जणांविरोधात फौजदार गुन्हा

0
10

सोलापूर, दि. 3

  • राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या युवक नेत्याच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर, त्याच्या पत्नीसह सात जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • आठ जून रोजी कोणाला न सांगता ओंकार हजारे हा घराबाहेर पडला होता.मात्र बराच वेळ घरी न आल्यामुळे शोधा शोध घेतल्यानंतर सुपर मार्केट येथे ओंकार हजारे हा कार मध्ये बेशुद्ध अवस्थेत दिसून आला.मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
  • ओंकार हजारे हा अजित पवार राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून कार्यरत होता .
  • ओंकार हजारे यांच्या आत्महत्या प्रकरणी माजी उपमहापौर नाना काळे, पत्नी स्वाती हजारे, ज्ञानेश्वर पवार, जयश्री पवार, मंगेश पवार, निखिल बनसोडे, ओम घाडगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
  • ओंकार आणि स्वाती यांचा 2019 साली झाला होता. प्रेम विवाह, स्वातीच्या कुटुंबीयांचा प्रेम विवाहला विरोध होता. ओंकारला त्यामुळे त्रास देत होते.
  • सासरची मंडळी आणि माजी उपमहापौर नाना काळे त्रास देत असल्याचा समाज माध्यमांवर स्टेटस आठ जून रोजी ओंकारने ठेवला होता.
  • स्वाती ओंकारकडे घटस्फोट मागत होती त्यासाठी सासरची मंडळी आणि नाना काळे त्रास देत असल्यामुळेच आत्महत्या केल्याच्या कारणावरून सात जणांविरोधात गुन्हा दाखल.