अंगावर दोन ग्रेनेड फुटले, गोळ्या लागल्या; युद्ध सुरु असताना अचानक आवाज आला, बेटा… अंगावर काटा…

0
8

पुणे , दि. ३ ( पीसीबी )ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांनी कारगिल युद्धात दुश्मनाच्या दोन ग्रेनेड आणि अनेक गोळ्या झेलत अद्वितीय शौर्य दाखवले. गंभीर जखमी असूनही त्यांनी सहकाऱ्यांना मदत करत दुश्मनाच्या अनेक सैनिकांना पराजित केले. त्यांच्या या अतुलनीय साहसामुळे युद्धाचा नवा वळण मिळाला आणि त्यांना १९९९ मध्ये परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. अवघ्या १९ वर्षांच्या वयात ते परमवीर चक्र मिळवणारे पहिले भारतीय सैनिक ठरले.

पुणे हादरलं! कोंढव्यात तरुणीच्या तोंडावर केमिकल स्प्रे मारून बलात्कार; कुरिअर बॉयच्या बतावणीने खळबळ

पुणे शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोंढवा परिसरात (Kondhva) बुधवारी रात्री घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ठरली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात इसमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने कुरिअर बॉय असल्याचं सांगत सोसायटीत प्रवेश मिळवला आणि तोंडावर केमिकल स्प्रे करत पीडितेवर अत्याचार केला.

घटना २ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. तरुणी आपल्या भावासोबत कोंढव्यात राहत असून, मूळची अकोल्याची आहे. ती पुण्यातील कल्याणी नगरमधील एका कंपनीत काम करते. आरोपीने बँकेचं कुरिअर असल्याचं सांगून दरवाज्याशी बोलणी केली आणि सहीची जबाबदारी असल्याचं सांगून सेफ्टी डोअर उघडायला लावलं. त्याच क्षणी त्याने तोंडावर केमिकल स्प्रे करून तरुणीला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

सुरक्षित सोसायटीत घडलेली घटना; सुरक्षेवर गंभीर प्रश्न :

कोंढव्यातील गार्डेड आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये घडलेली ही संतापजनक घटना सोसायटीच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित करते. आरोपीने अतिशय योजनाबद्ध पद्धतीने कुरिअर बॉय असल्याचे भासवत प्रवेश मिळवला. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, सोसायटीच्या सुरक्षारक्षकांनी त्याची नीट चौकशी केली नव्हती. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आरोपीच्या ओळखीवर काम सुरू आहे.

सुरक्षारक्षकांची हलगर्जीपणा आणि कमी पडलेली पडताळणी ही या घटनेतील गंभीर बाब ठरते. विशेष म्हणजे, अशा प्रकारच्या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीने सुरू केला असून, गुन्हेगार लवकरच सापडेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोंढवा पोलिसांनी घटनेच्या तपासासाठी १० विशेष पथकांची नियुक्ती केली आहे. पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सध्या मानसिक धक्क्यात असून तिच्या जबाबासाठी महिला अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा आणि फिंगरप्रिंट्सवरून आरोपीचा माग काढण्याचं काम सुरू आहे.

दरम्यान, शहरातील इतर सोसायट्यांनाही याप्रकरणी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुरिअर डिलिव्हरी करणाऱ्यांची ओळख आणि नोंदणी प्रक्रिया अधिक काटेकोर करण्याची गरज असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे.