भोसरी, दि. 2 ( पीसीबी ) लायन्स क्लब भोजापुर गोल्ड च्या सेवावर्षाची सुरवात अतिशय भव्य झाली. बिर्ला हॉस्पिटलचे
प्रसिद्ध ह्रदयशल्य विशारद डॉ. समित चौता आणि प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. मेघनाद पडसलगीकर यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित केले. मान्यवर 20 डॉक्टरांनाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी होत्या कलियुगातील सावित्री प्रा अर्चना राचमाले (रियल लाईफ हिरो) कर्नल शशी राचमाले यांच्या सुविद्य पत्नी. आई पती आणि मुलाला झालेल्या दुर्धर कॅन्सरशी अविरत झुंज देऊन कॅन्सरला हरवणाऱ्या प्रा राचमाले यांनी उपस्थितांना आहार विहार व व्यायाम याबद्दल अतिशय सुंदर प्रबोधन केलं. झोन चेअरमन MJF ला मुकुंद आवटे यांच्या शुभहस्ते डॉक्टरांना सन्मानित केलं गेलं. तर भोजापुर च्या प्रथम लेडी प्रा तृप्ती शर्मा यांनी उपस्थितांच स्वागत केलं. क्लब मधील बहुतेक सर्व माजी अध्यक्ष व इतर सदस्य या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.