100 मुलांचा बाप सव्वा लाख कोटींची संपत्ती वाटणार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

मुंबई, दि. २१ : आपल्या पाश्च्यात आपल्या मुलांमध्ये संपत्तीवरून वाद किंवा कोणत्याही प्रकारचं भांडण होऊ नये यासाठी मध्यमवर्गीय असो किंवा करोडपती-अब्जाधीश उद्योगपती, पहिल्यापासूनच प्लॅनिंग करू लागतात. आपल्या मध्य असाच एक अब्जाधीश आहे जो लग्न न करता शंभरहून अधिक मुलांचा बाप बनला आणि आता त्याने आपली जबाबदारी समजून आपली अख्खी संपत्ती या मुलांमध्ये बरोबर वाटायचा निर्णय घेतला आहे.

‘रशियाचा मार्क झुकरबर्ग’ किंवा ‘रशियाचा एलोन मस्क’ म्हणून ओळखला जाणारा पावेल दुरोव 40 वर्षांचा तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिभावान आणि अब्जाधीश उद्योजक आहे. रशियन उद्योगपती पावेल दुरोव यांनी 2013 मध्ये टेलिग्राम मेसेजिंग प्लॅटफॉर्म सुरू केला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, सध्या त्यांची संपत्ती 13.9 अब्ज डॉलर्स असून टेलिग्राम संस्थापकाने त्यांची संपूर्ण संपत्ती 100 हून अधिक मुलांसाठी सोडून देतील ज्यांनी त्यांचा मुलगा किंवा मुलगी असल्याचा दावा केल्याचे जाहीर करून खळबळ उडवली आहे.

रशियामध्ये जन्मलेल्या दुरोव्हने वयाच्या 22 व्या वर्षी रशियातील सर्वात मोठे सोशल नेटवर्क VKontakte तयार केले पण टेलिग्रामने त्यांना खरी ओळख दिली, जे आज 1 अब्जाहून अधिक वापरकर्त्यांसह जगातील सर्वात मोठे मेसेजिंग प्लॅटफॉर्म बनले आहे.

Share This Article