विमान नेमके कसे कोसळले, इंंजिन बिघडले की पक्षी धडकले…

0
161

अहमदाबाद दि . १२ ( पीसीबी ) : गुजरातमधील अहमदाबाद शहरात एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला या बाबातचे निश्चित कारण स्पष्ट होत नाही. विमान इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याची तसेच दोन पक्षी धडकल्याने अपघात झाल्याची दाट शक्यता व्यक्त कऱण्यात आली आहे. विमान इमारतीला धडकल्याने पेटले की अन्य काही कारण आहे याचा तपास सुरू असून ब्लॅक बॉक्स मधून नेमके कारण समजणार आहे.
अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या या विमानात एकूण 242 प्रवासी होते. टेकऑफनंतर अवघ्या 5 मिनिटांतच हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या दुर्घटनेमुळे परिसरात आगीचे आणि धुराचे लोट पसरल्याचे दिसून येत आहेत. या अपघाताची दोन संभाव्य कारणे देखील समोर येत आहेत. पहिलं कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूला काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमानाने एका इमारतीला धडक दिल्यानंतर त्यात भीषण स्फोट होऊन ते पूर्णतः जळून खाक झालं.